Saru Hospital

Home अपेन्डिक्स

अपेन्डिक्स

Appendix | अपेन्डिक्स | Dr Sachin Deore

अपेन्डिक्स म्हणजे काय

Appendix किंवा ‘अपेन्डिक्स’ हा सर्वांच्या परिचयाचा शब्द आहे. अपेन्डिक्स म्हणजे आंतरपुच्छ. शेपटीसारखा दिसणारा छोट्या आणि मोठ्या आतड्याच्या जोडाला असणारा आतड्याचाच एक भाग. सर्वसामान्यपणे अशी कल्पना असते की, अपेन्डिक्स सर्वाना नसते, आणि असल्यास त्याचा त्रास होतो. वास्तविक कोट्यवधी लोकांमध्ये एखाद्याला ते नसते. जन्मतः विकृतींपैकी ही एक आहे. जन्मतःच विकृतीमध्ये दोन अपेन्डिक्स एकाच व्यक्तीला असू शकतात. सर्वसाधारणपणे जन्मतः ते उजवीकडेच असते. शरीराच्या रोगप्रतिबंधक क्रियेत अपेन्डिक्सचा सहभाग असावा असे सांगण्यात आलेले आहे. वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये त्याचा आकार कमी-जास्त असतो. पण सरासरी अपेन्डिक्स ७ ते ९ सेमी. आकाराचे असते. त्यामध्ये दाह झाल्यानंतर त्याचे आकारमान वाढते व ते एक फुटापर्यत देखील होऊ शकते. अपेन्डिक्स असले की त्याचा त्रासच होईल, हा गैरसमज आहे. काही व्यक्तींना त्याचा त्रास होतो. पण काही लोकांना आयुष्यभर त्रास होत नाही

 

लक्षणे :

  • सुरुवातीला पोटदुखी होते. बेंबीच्या खालपासून वेदना सुरु होतात आणि हळूहळू पोटाच्या खालच्या उजव्या बाजूला वेदना सुरु होता. काही वेळा फक्त बेंबीच्या खाली पोटात वायू धरल्याची भावना होते.
  • दुखणे गंभीर झाल्यास पोटदुखीबरोबर उलट्याही सुरु होतात.
  • अधिक संसर्ग झालेला असल्यास तापही येतो. अॅपेडिसिटिस मध्ये वेदना, उलट्या आणि ताप असा क्रम दिसतो.
  • त्याशिवाय भूक मंदावणे, जुलाब होणे, आंव पडणे किंवा बद्धकोष्ठता होणे आदी लक्षणे दिसतात.
  • काही वेळा वेदना वेगळ्या जागी होऊ शकतात.
  • गर्भावस्थेत हा त्रास झाल्यस पोटाच्या खालच्या बाजूला वेदना होत असतात.

निदान कसे करतात?

पोटाच्या उजवीकडील भागात दुखते व एका विशिष्ट भागात जास्त दुखते ज्याला ‘मॅकबर्निज पॉइंट’ म्हणतात, त्याठिकाणी सर्वात जास्त त्रास असतो. असे अनेक रोग आहेत ज्यामध्ये पोटाच्या उजव्या बाजूला दुखू शकते व त्याची लक्षणे अपेन्डिक्स रोगासारखी असू शकतात. नेमक्या निदानासाठी रक्त, लघवी, क्ष-किरण, अल्ट्रासाउंड अशा काही चाचण्या कराव्या लागतात. रक्तामध्ये विशिष्ट प्रकारच्या पेशी जास्त प्रमाणात आढळतात तेव्हा अपेन्डिक्सच्या दाहामुळे त्या आहेत असे म्हणता येईल. अपेन्डिक्स क्ष-किरण चाचणीत दिसत नाही. परंतु मूत्रनलिकेतील खडा एक्स-रेमध्ये दिसतो. आणि निदान करण्यास मदत होते.
अॅपेडिक्सचे निदान क़रण्यासाठी रक्तातील पांढèया पेशींचे प्रमाण तपासणे. त्या वाढल्या असतील तर शरीरात संसर्ग झाल्याचे लक्षात येते. युरिन टेस्ट केली जाते. गरज भासल्यास सोनोग्राफी क़रण्यात येते. बहुतेकदा सोनोग्राफीमधून अॅपेंडिक्सला आलेली सूज दिसून येते. गरज भासल्यास डॉक्टर सीटी स्कॅन, एक्स रे करण्याचा सल्लाही देतात. त्याशिवाय रुग्णाच्या इतर काही चाचण्या केल्या जातात.

 

शस्त्रक्रिया न केल्यास…

अपेन्डिक्सचा अटॅक आल्यानंतर तो त्रास वाढत जाऊन अपेन्डिक्स फुटू शकतो. शरीरातील प्रतिबंधक शक्तीमुळे गोळा तयार होऊ शकतो किंवा भविष्यात वारंवार अटॅक येऊ शकतात. पोटात सौम्य स्वरूपाच्या वेदना राहण्याची शक्यता असते.

 

उपाय:

सर्वसाधारणपणे अॅपेडिक्स चे निदान झाल्यावर अँटीबायोटिक्स देऊन वेदना आणि संसर्ग कमी करण्याचा प्रयत्न करतात. पण त्यानंतरही वेदना आणि सूज कमी न झाल्यास शस्त्रक्रिया हा एकच उपाय असतो. त्यात दोन प्रकार आहेत. एक पोटाला चीर देऊन अॅपेंडिक्स काढून टाकले जाते आणि दुसरे लॅप्रोस्कोपी म्हणजे दुर्बिणीद्वारे पोटाला भोक पाडून अॅपेडिक्स काढून टाकले जाते. दुसऱ्या शस्त्रक्रियेत रुग्ण लवकर बरा होऊन दैनंदिन कार्य करु शकतो.
अॅपेडिक्स टाळता येईलच असे नाही पण दैनंदिन आहारात काही बदल जरुर करावेत. भरपूर पाणी प्यावे. तंतूमय म्हणजे चोथायुक्त आहार असावा. थोडक्यात रोजच्या जेवणात पालेभाज्या, कच्च्या भाज्या, सलाड असावे. रोज फळांचे सेवन करावे. भाकरी पोळी यांचे सेवन करावे. तसेच हातसडीच्या तांदळाचा भात सेवन करावा. मैद्यापासून बनवलेले पदार्थ खाऊ नयेत