Saru Hospital

Home मुळव्याध

मुळव्याध

मुळव्याध म्हणजे काय

मूळव्याध हा मानवी शरीराच्या मूळाशी जी व्याधी होते तो आजार आहे. या रोगास संस्कृतमध्ये ‘अर्श’ असे नाव आहे. यामध्ये दोन प्रकारचे रोग आहेत – यात विनारक्तस्त्राव (मोडाची मूळव्याध) व रक्तास्त्रावसहित (रक्तमूळव्याध). या रोगात गुदद्वाराच्या सभोवताल आतमध्ये जे रक्तवाहिन्या असतात त्या बाहेर येतात. त्याने तेथे सतत ठणकल्यागत वेदना होते. क्वचित रक्तस्त्राव पण होतो. काटा टोचत आहे अशी भावना होते. अधिक रक्तस्त्राव झाल्यास व्यक्ती माडे रक्त कमतरता (अनिमिया) निर्माण होते. गुदद्वाराची आकुंचन क्षमता क्रमशः नष्ट होत जाते. पुष्कळ काळ लोटल्यावर मग संग्रहणी हा रोग पण होउ शकतो.[ संदर्भ हवा ] या अवघड जागेच्या दुखण्याचा संबंध संपूर्ण पचनसंस्थेशी आहे.

 

एक वेदनारहित शल्य चिकित्सा

मूळव्याधीच्या प्रचलित उपचारांचे बरेच तोटे आहेत. कुठलीच प्रचलित उपचार पध्दती मूळव्याधीच्या त्रासापासून संपूर्ण व कायमची मुक्ती देऊ शकत नाही. या प्रचलित उपचारांमध्ये ऑपरेशन पूर्वी तयारी, ऑपरेशनंतर वेदना व दीर्घकाळ हॉस्पिटलमधे दाखल होण्याची आवश्यकता, कामावर लवकर रुजू होता न येणे व मूळव्याध पुन्हा होण्याची शक्यता हे तोटे आढळतात.

जगभरातील शल्यतंत्रज्ञ यासाठीच मूळव्याधीवर परिणामकारक व कायमचा इलाज शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत.

एक अशीच अत्याधुनिक शल्यक्रिया आता प्रचलित झाली आहे. लोंगो टेक्निक किंवा स्टेपलर हिमो-हॉडेक्टॉमी या नावाने प्रचलित हे तंत्र मूळव्याधीच्या उपचारांवरील एक अत्यंत उपयुक्त, परिणामकारक व कायमस्वरुपी इलाज आहे.

स्टेपलर हिमो-हाँडेक्टॉमी (पी.पी.एच.)

एकदाच वापरायचे स्टेपलर वापरुन केलेल्या या तंत्रास प्रोसिजर फॉर प्रोलॅप्स अँड हिमॅरॉईडस बाय स्टेपलर टेक्निक (पी.पी.एच.) असेही म्हणतात. हे ऑपरेशन मूळव्याधीच्या स्लाईडिंग एनल थिअरी अवलंबून आहे. मूळव्याध ही बाकी काही नसून गुदमार्गाच्या अंतर्गत श्लेष्मल त्वचेचे (म्युकस मेंब्रेन) खाली ढळणे आहे अशी ही संकल्पना आहे. या शस्त्रक्रियेत एक वर्तुळाकार डायलेटर वापरुन हे ढळणे पुन्हा जागेवर सरकवले जाते व अतिरिक्त श्लेष्मल त्वचा काढून टाकली जाते. वर्तुळाकार आकारातील ही शस्त्रक्रिया एका विशिष्ट स्टेपलिंग तंत्राने केली जाते.

यामुळे मूळव्याधीत रक्तपुरवठा करणा-या रक्तवाहिन्यांच्या शेवटच्या शाखाही बांधून टाकल्या जातात. थोडक्यात अतिरिक्त श्लेष्मल त्वचेचा एक वर्तुळाकार भाग त्यातील फुगलेल्या रक्तवाहिन्यां सकट काढून टाकला जातो व उरलेला भाग ‘स्टेपल’ केला जातो. यासाठी जो स्टेपलर वापरला जातो तो पुन्हा उपयोगात आणला जात नाही. याद्वारे । गुदमार्गाची पूर्ण रचना मूळपदावर आणली जाते. या संपूर्ण शस्त्रक्रिये दरम्यान किंवा नंतरही रुग्णाला कुठल्याही त-हेच्या वेदनांना सामोरे जावे लागत नाही.

या शस्त्रक्रियेचे फायदे

  • वेदनांपासून त्वरित आराम
  • हॉस्पिटलमधील वास्तव्य एक दिवसाचे
  • आहारावर नियंत्रणाची जरुर नाही
  • कामावर लवकर रुजू होता येते
  • मूळव्याध पुन्हा होण्याची शक्यता नाही
  • शस्त्रक्रिया जागेवर भूल देऊनही करता येते – शस्त्रक्रिया दरम्यान रक्तस्राव नाही.

 

मूळव्याधची मुख्य लक्षणे

खाज येणे – गुद्द्वाराजवळ खाज येणे हे मूळव्याधीतील एक प्रमुख लक्षण आहे. त्यामागील निदान करण्यासाठी अ‍ॅनल पॅथोलॉजी करावी. हा त्रास कमी न झाल्यास त्वचेवर इंफेक्शन पसरण्याची शक्यता असते.

वेदना जाणावणे – वैद्यकीय सल्ल्यानुसार, शौचाच्या ठिकाणी वेदना किंवा त्रास जाणवणे हे मूळव्याधीचे लक्षण आहे. कोलनोस्कॉपी किंवा एमआयआर सारख्या निदान पद्धतीतून त्याचे योग्यपद्धतीने निदान होऊ शकत नाही. त्यामुळे गुद्द्वाराजवळ तीव्र वेदना जाणवत असल्यास गॅस्ट्रोइंटरोलॉजिस्टचा सल्ला घ्यावा. काही लोकांना फिशरच्या त्रासामध्येही वेदना जाणवू शकतात.

सूज, गाठ- अनेकांना गुद्द्वाराजवळ गाठ किंवा सूज आढळत असल्यास त्याकडे लक्ष द्यावे. कॅन्सरची गाठ गुद्द्वाराजवळ आढळण्याची वेळ फारशी येत नाही. मात्र मूळव्याधीमध्ये हे लक्षण आढळून येते

शौचाच्यावेळी वेदना- मूळव्याधीच्या त्रासामध्ये गुद्द्वाराजवळील रक्तवाहिन्यांवर दाब आल्याने मलविसर्जनाच्या वेळेस रक्त पडते. सोबतच वेदना जाणवतात. त्यामुळे बद्धकोष्ठता किंवा आयबीएसच्या त्रासापेक्षा मूळव्याध अधिक तीव्र असतो. यामध्ये पोटाच्या खालच्या बाजूला वेदना होतात.

शौचातून रक्त पडणे- पोटाच्या कॅन्सरपासून ते मूळव्याधीपर्यंत रक्त पडणे हे लक्षण आढळून येते. त्यामुळे तुम्हांला हे लक्षण आढळल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मूळव्याध किंवा इतर कोणत्या नेमक्या आजारामुळे हा त्रास होत आहे हे वेळीच समजणं गरजेचे आहे.

 

मुळव्याधचे कारणे:

संडासला कायम जोर करण्यामुळे आणि कुंथण्यामुळे मूळव्याध होऊ शकते. व्यायामाचा अभाव, आहारात तंतूमय पदार्थांची कमतरता, कडक मलप्रवृत्ती, मलावरोध, सतत अति उष्ण(गुणाने) पदार्थ खाणे,वातकारक व रुक्ष पदार्थ खाणे,अति तिखट सेवन,सतत बैठे काम, व्यायाम,अनियमित दिनचर्या,रक्तदोष, वेळच्या वेळ शौचास न जाणे, अति जागरण तसेच व्यायामाचा अभाव, मधुमेह, वृद्धत्वामुळे येणारे पचनाचे दौर्बल्य, गर्भारपण, आमांश अशा अनेक बाबी इत्यादी. गुदद्वारावर जोर देणे. मल अवस्थ्म्भा [ संदर्भ हवा ] अती उश्ण वातावरणात होण्याचि शक्य्ता.

 

मूळव्याध वाढविणार्या घटकांमध्ये खालील घटक समाविष्ट आहेत:
• जास्त वजन किंवा लठ्ठ असणे

• आहारामध्ये फायबरचा प्रमाण असल्यामुळे सतत कब्ज होणे.

• दीर्घकाळ शौचाची समस्या

• जड वस्तू उचलणे

• सतत खोकला किंवा वारंवार उलट्या

• गर्भवती असताना (बाळाला जन्म दिल्यानंतर रक्तस्राव सामान्यतः सुधारतो)

• 45 वर्षापेक्षा जास्त वय – जसे जसे वय वाढत जाते तसे तसे शरीरास आधार देणारे घटक कमजोर होत जातात आणि मूळव्याध होण्याचा धोका वाढवित जातो.

 

मुळव्याधचे उपचार

हिरव्या पालेभाज्या, कोशिंबिरी, फळे असे चोथायुक्त पदार्थ आहारात भरपूर प्रमाणात घेणे आवश्यक असते. दही, ताक याचा वापर करणे, रोज भरपुर पाणी पिणे, नाश्ता व जेवण वेळच्या वेळी घेणे हे आवश्यक असते. हा रोग अनेक दिवस लपविल्या जातो त्यामुळे तो वाढल्यावर लोकं उपचारासाठी धावतात.ऍलोपॅथी मध्ये शस्त्रक्रिया हा उपचार आहे.[ संदर्भ हवा ] .या रोगात पथ्य फारच जरुरी आहे.